आजपर्यंतची सर्वांत खराब फलंदाजी - मॉर्गन

पीटीआय
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

बंगळूर - भारताविरुद्धची टी-20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंड कर्णधार इऑन मॉर्गन याने पराभवाचे सारे खापर अपेक्षितपणे फलंदाजांवर फोडले. अलीकडच्या काळातील आमच्या फलंदाजांची ही सर्वांत खराब कामगिरी, असे तो म्हणाला.

विजयासाठी 203 धावांची आवश्‍यकता असताना इंग्लंड 2 बाद 119 असे सुस्थितीत होते. चौदाव्या षटकातील या स्थितीनंतर इंग्लंडने आठ धावांत आठ गडी गमावले आणि सतराव्या षटकातच पराभव ओढवून घेतला. मॉर्गन म्हणाला, 'आमची सुरवात चांगली होती. आमचे आव्हान कायम होते; पण आमच्या फलंदाजांनी अत्यंत निकृष्ट दर्जाची कामगिरी केली. एका षटकात मी आणि रुट बाद झालो, तेथे भारतीयांना वर्चस्वाची संधी निर्माण झाली आणि ती त्यांनी अचूक साधली.''

संघाच्या कामगिरीविषयी मॉर्गन म्हणाला, 'मी कुणा एकाकडे बोट दाखवणार नाही. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही हेच खरे. एक काळ फलंदाजी इंग्लंडची ताकद होती; पण भारतीय गोलंदाजांनी ती मोडून काढली. आमच्या गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली.''

Web Title: The day the poor batting