देवधर करंडकासाठी रोहित, पार्थिव कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

पुणे - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्मा आणि पार्थिव पटेल यांची अनुक्रमे इंडिया ब्ल्यू आणि रेड संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. निवड समितीने मंगळवारी हे दोन्ही संघ जाहीर केले. विजय हजारे करंडक स्पर्धेतील विजेता तमिळनाडू हा स्पर्धेतील तिसरा संघ असेल. ही स्पर्धा २५ ते २९ मार्च दरम्यान विशाखापट्टणम येथे होईल.

मांडीवर झालेल्या शस्त्रक्रियेतून बरा झाल्यावर रोहित एका महिन्याभरातच मैदानावर परतणार आहे. ऑक्‍टोबर २०१६ नंतर रोहित एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याच वेळी हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना त्याला दोन सामन्यात केवळ ४ आणि १६ धावांच करता आल्या आहेत. त्याच्या नेतृत्त्वाखालील ब्ल्यू संघात श्रेयस अय्यर, हरभजनसिंग, शाहबाद नदीम आणि १८ वर्षीय यष्टिरक्षक रिषभ पंत यांना स्थान मिळाले आहे. 

हजारे करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेल्या महाराष्ट्राच्या संघातील केवळ केदार जाधवला या स्पर्धेसाठी स्थान मिळाले असून, तो ‘रेड’ संघात असेल. त्याच्याशिवाय शिखर धवन, मनीष पांडे, इशांक जग्गी यांना या संघात स्थान मिळाले आहे. 

संघ ः इंडिया ब्ल्यू ः रोहित शर्मा (कर्णधार), मनदीप सिंग, श्रेयस अय्यर, अंबाती रायुडू, मनोज तिवारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक हुडा, हरभजन सिंग, कृणाल पंड्या, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा, पंकज राव.

रेड ः पार्थिव पटेल (कर्णधार, यष्टिरक्षक), शिखर धवन, मनीष पांडे, मयांक अगरवाल, केदार जाधव, इशांक जग्गी, गुरकीरत मान, अक्षर पटेल, अक्षय कर्नेवार, अशोक दिंडा, कुलवंत खेज्रोलिया, धवल कुलकर्णी, गोविंद पोदार.

Web Title: Devdhar trophy