esakal | INDvsAUS : उसळलेल्या तलवारी म्यान; ऑस्ट्रेलियासमोर भारतीयांची शरणागती
sakal

बोलून बातमी शोधा

Dhawan, Rahul Shine But Australia Bowl Out India For 255

ताकदवर आक्रमणासमोर क्षमतेचा खऱ्या अर्थाने कस लागण्याच्या लढाईत भारतीय फलंदांच्या तलवारी बोथट झाल्या आणि ऑस्ट्रेलियाविरु्दधच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच प्रथम फलंदाजी करताना 255 धावाच करता आल्या.

INDvsAUS : उसळलेल्या तलवारी म्यान; ऑस्ट्रेलियासमोर भारतीयांची शरणागती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ताकदवर आक्रमणासमोर क्षमतेचा खऱ्या अर्थाने कस लागण्याच्या लढाईत भारतीय फलंदांच्या तलवारी बोथट झाल्या आणि ऑस्ट्रेलियाविरु्दधच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच प्रथम फलंदाजी करताना 255 धावाच करता आल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अगोदरच्या प्रतिस्पर्ध्यांविरु्दध भले कितीही मर्दूमकी गाजवली असली तरी पूर्ण ताकदिनीशी उतरणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोरची लढाई सोपी नसणार हे उघड होते. पण मुक्त फलंदाजी करण्याऐवजी दडपणाचे घेतलेले ओझे भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडणारे ठरले. 

भाजप आमदाराची दादागिरी, शेजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरु्दध म्यानातून उसळलेल्या तलवारींचा आज ढालीप्रमाणे वापर करण्याची वेळ भारतीयांवर आली. 25 व्या षटकांत पहिला षटकार मारण्यात आला हे त्याचे द्योदत होते.

धवनची संथ सुरुवात
शिखर धवनने सर्वाधिक भले 74 धावांची खेळी केली पण त्यासाठी त्याने 91 चेंडू खर्ची घातले. सलामीवीर डावाची दिशा गती ठरवत असतो. रोहित शर्मा संघात परतलेला असला तरी शिखर धवनचे संघातले स्थान कायम राहिले. काही दिवसांपूर्वी त्याने भले त्याने श्रीलंकेविरुदधच्या ट्वेन्टी-20 सामन्यात चांगली खेळी केली असेल पण आज सामना ऑस्ट्रेलियाशी होती. मिशेल स्टार्क आणि पॅट कमिंस यांनी बरोबर शरिराच्या दिशेने मारा करून धवनला जखडून टाकले. रोहितने भले पहिल्याच षटकात दोन खणखणीत चौकार मारून आश्वासक सुरुवात केली, पण दुसऱ्या बाजूने 12 चेंडूत एक धाव करणाऱ्या धवनमुळे त्याला धोका स्वीकारावा लागला आणि त्यातच तो बाद झाला.

धक्का स्टार्ट
तिसऱ्या क्रमांकावर आलेला केएल राहुल दोन क्षेत्ररक्षकांमधून चेंडू मारत होता, पण दुसऱ्या बाजुला धवन 20 चेंडूत तीन धाा करत होता. कोठे तरी धावांचा वेग  वाढवायला हवा याची जाणीव होताच धननने सलग दोन चौकार मारून दडपण उडवण्याचा प्रयत्न केला. `धक्का स्टार्ट`नंतर त्याची गाडी कोठे तरी वेग पकडण्याची चिन्हे दिसू लागली होती, पण एकेरी दुहेरी धावा त्याला काढता येत नव्हत्या.  

विराट कोहलीही अपयशी
शतकी भागीदारीनंतर धवन आणि राहुल 11 चेंडूत बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या विराटचा या क्रमांकावरची सरासरी चांगली आहे. त्याने झाम्पाला षटकार मारून बॅट पारजली खरी परंतु पुढच्याच चेंडूवर तो झाम्पाकडेच झेल देऊन बाद झाला आणि तेथेच भारताचा डाव संकटात आला. संघाला आज गरज असताना श्रेयस अय्यरही अपयशी ठरला. 

अखेरच्या षटकांत काऊंटडाऊन
निम्मा संघ 33 व्या षटकांत 164 धावात बाद झाल्यावर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्यावर उरल्या सुरल्या सर्व आशा होत्या पण आशा निर्माण करून तेही बाद झाले. अखेरच्या षटकांत एरवी धावांचा वेग वाढवणारा खेळ होत असतो परंतु  44 व्या षटकांपासून भारताच्या गोलंदाजांची रांग सुरु झाली आणि डावाचे काऊंटडाऊनही सुरु झाले. 

संक्षिप्त धावफलक : भारत ः 49.1 षटकांत सर्वबाद 255 (रोहित शर्मा 10 - 15 चेडू, 2 चौकार, शिखर धवन 74 -91 चेंडू 9 चौकार, 1 षटकार, केएल राहुल 47 - 61 चेंडू 4, चौकार,  विराट कोहली 16- 14 चेंडू 1 षटका, रिषभ पंत 28 - 33 चेंडू, 2 चौकार,  १ षटकार, रवींद्र जडेजा 25- 32 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, मिशेल स्टार्क 56-3, पॅट कमिंस 44-2, झाम्पा 53-1, अॅगर 56-1)

loading image
go to top