अन् धोनी-भुवीने असे अडकवले फिंचला जाळ्यात (व्हिडिओ)

शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची मनस्थिती आणि फलंदाज नेमकं काय करायचा प्रयत्न करत आहे, हे धोनी अचूक ओळखतो आणि सहकाऱ्यांना त्यानुसार सल्लेही देतो.

मेलबर्न : मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची मनस्थिती आणि फलंदाज नेमकं काय करायचा प्रयत्न करत आहे, हे धोनी अचूक ओळखतो आणि सहकाऱ्यांना त्यानुसार सल्लेही देतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्‍वर कुमारने ऍरॉन फिंचचा अडथळा दूर केला आणि यामध्ये धोनीचा 'सल्ला' मोलाचा ठरला. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील नवव्या षटकात भुवनेश्‍वर गोलंदाजी करत होता. पहिले पाच चेंडू निर्धाव होते. फिंच क्रीझच्या पुढे येऊन खेळत होता. हे धोनीने अचूक टिपले. त्यामुळे त्याने भुवनेश्‍वरला सल्ला दिला, की चेंडू आता क्रीझच्या मागून टाक! 

नवव्या षटकातील शेवटचा चेंडू भुवनेश्‍वरने पंचाच्याही मागून टाकला. आश्‍चर्यचकित झालेल्या पंचांनी हा चेंडू 'डेड' ठरविला. या सगळ्यांत फिंच गोंधळला होता. पुढच्या चेंडूवर भुवनेश्‍वरने फिंचला पायचीत केले. 

Web Title: dhoni and bhuvneshwar kumar plans successfully trap aaron finch