ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमधून धोनीला निरोप

वृत्तसंस्था
Saturday, 27 October 2018

रोहितला कसोटीसाठी स्थान 
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमालीचा फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. 

पुणे : खराब फॉर्ममुळे सध्या तळ्यात मळ्यात अशी अवस्था झालेला माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला अखेर ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमधून निरोप देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. पुढील महिन्यात मायदेशात होणारी ट्‌वेन्टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्‌वेन्टी-20 मालिका यातून धोनीला वगळण्यात आले आहे.

धोनी सध्या केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळणार असल्याचे चित्र आहे. विंडीजविरुद्धच्या ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे. 
निवड समितीने आज विंडीजविरुद्धची ट्‌वेन्टी-20, ऑस्ट्रेलिया दोऱ्यातील कसोटी मालिका आणि ट्‌वेन्टी-20 मालिका यांसाठी संघ जाहीर केले. सध्या झटपट क्रिकेटमध्ये खेळत असलेल्या धोनीसाठी ट्‌वेन्टी-20 क्रिकेटचे मार्ग बंद करण्यात आले. रिषभ पंतची या तिन्ही संघात निवड करण्यात आली. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वहिला ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक जिंकला होता. 

दरम्यान, तंदुरुस्त असूनही पुण्यातील विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी विचार न झालेल्या केदार जाधवला पुढील दोन सामन्यांसाठी निवडण्यात आले आहे. मात्र आशिया करंडक स्पर्धेत दुखापत झालेल्या हार्दिक पंड्याला कोणत्याही संघात स्थान देण्यात आले नाही, मात्र मर्यादित षटटकांच्या क्रिकेटसाठी त्याचा भाऊ कुणाल पंड्याला स्थान देण्यात आले आहे. 

रोहितला कसोटीसाठी स्थान 
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमालीचा फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. 

संघ : 
विंडीजविरुद्धची ट्‌वेन्टी-20 मालिका ः रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, यझुवेंदर चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, शहाबाज नदीम. 
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ः विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, महम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, बुमरा, भुवनेश्‍वर कुमार. 
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्‌वेन्टी-20 मालिका ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, कुलदीप यादव, यझुवेंदर चहल, वॉशिंग्टन सुंदर, कुणाल पंड्या, भुवनेश्‍वर कुमार, बुमरा, उमेश यादव आणि खलील अहमद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhoni dropped team india from T20I series against Windies, Australia