धोनी करतोय वेगळ्याच पद्धतीने हेड मसाज

Sunday, 12 August 2018

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका वेगळ्याच प्रकारची हेड मसाज आवडते, नुकताच धोनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका धबधब्याखाली अांघोळ करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने असे म्हटले आहे. गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटसाठी खेळत असताना अशा गोष्टींसाठी वेळ मिळालेला नाही. परंतु, अशा गोष्टी केल्यानंतर जुन्या गोष्टींना उजाळा मिळतो. ही हेड मसाज एकदम विनामूल्य असल्याचेही त्याने सांगितले आहे.

रांची : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका वेगळ्याच प्रकारची हेड मसाज आवडते, नुकताच धोनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका धबधब्याखाली अांघोळ करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने असे म्हटले आहे. गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटसाठी खेळत असताना अशा गोष्टींसाठी वेळ मिळालेला नाही. परंतु, अशा गोष्टी केल्यानंतर जुन्या गोष्टींना उजाळा मिळतो. ही हेड मसाज एकदम विनामूल्य असल्याचेही त्याने सांगितले आहे.
 

महेंद्रसिंग धोनीने गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले. भारताला (टी-20 आणि वन डे) विश्वचषक जिंकून देण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. त्याने आपल्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. परंतु, या प्रवासात धोनीने वैयक्तिक आयुष्यातला आनंद घेण्याची संधी खूपवेळा गमावली. परंतु, आता कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेला धोनी दहा वर्षांत मागे सुटलेले आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवत आहे, असेच त्याने इन्स्टावर टाकलेल्या व्हिडिओतून दिसत आहे.

दरम्यान, इंस्टावर टाकलेल्या व्हिडिओत धोनी रांचीतील एका धबधब्याखाली चिंब भिजत असल्याचे दिसत आहे. त्याने स्लो मोशनमध्ये हा व्हिडिओ बनविलेला आहे. त्या व्हिडिओत त्याने शेवटपर्यंत चेहरा दाखविलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhoni free head massage under waterfall