धोनी, हरभजन कर्णधार

पीटीआय
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - वन-डे संघाच्या कर्णधारपदाचा त्याग आणि त्यानंतर आयपीएलमध्ये पुणे संघाने कर्णधारपद काढून घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आता देशांतर्गत विजय हजारे वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी झारखंडचे नेतृत्व करणार आहे. त्याचवेळी भारतीय संघाचे दरवाजे बंद झालेला हरभजन पंजाबचा कर्णधार असेल.

धोनीचा समावेश आणि आक्रमक इशान किशन तसेच, फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम यांच्यामुळे झारखंडची ताकद आता वाढली आहे. त्याचबरोबर वरुण ॲरॉनला संघात स्थान मिळाले आहे. 

पंजाब संघात हरभजनच्या नेतृत्वाखाली युवराज, मनदीप, मनप्रीत अशा खेळाडूंचा समावेश आहे.

झारखंड संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), इशान किशन, इशांक जग्गी, विराट सिंग, सौरभ तिवारी, कौशल सिंग, प्रत्युष सिंग, शाहबाज नदीम, सोनू कुमार सिंग, वरुण ॲरॉन, राहुल शुक्‍ला, अनुकूल रॉय, मोनू कुमार सिंग, जसकरण सिंग, आनंद सिंग, कुमार देवव्रत, एस. राठोड, विकास सिंग

पंजाब - मानन व्होरा, शुभम गिल, जीवनज्योत सिंग, मनदीप सिंग, युवराज सिंग, गुरकिरत सिंग मान, गितांश खेरा, अभिषेक शर्मा, हरभजन सिंग (कर्णधार), मनप्रीत सिंग ग्रेवाल, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, वरुण खन्ना, बाल्तेज सिंग, मयांक सिधाना, शरल लुंबा, शुबेक गिल.

Web Title: Dhoni, Harbhajan captain