esakal | धोनी संघासाठी मोलाचा; शास्त्रींनी केले स्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

धोनी संघासाठी मोलाचा; शास्त्रींनी केले स्पष्ट

धोनी संघासाठी मोलाचा; शास्त्रींनी केले स्पष्ट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - इंग्लंडविरुद्ध झालेल्या निर्णायक सामन्यातील पराभवासह भारताला एकदिवसीय मालिकाही गमवावी लागली. मात्र भारताच्या पराभवापेक्षाही अखेरच्या सामन्यात धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतल्याच्या त्याच्या कृतीची जास्त चर्चा झाली. त्याच्या या कृतीचा कसोटी क्रिकेटशी संबंध जोडत त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले. मात्र भारतीय संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे, की धोनीने गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना चेंडू दाखवण्यासाठी तो पंचांकडून घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना शास्त्री म्हणाले, ''धोनीने भारत अरुण यांना दाखवण्यासाठी चेंडू घेतला होता. त्याला चेंडूची झालेली झिज अरुणला दाखवायची होती ज्यामुळे इंग्लंडमधील परिस्थितीचा अंदाज लावणे शक्य होईल.''

धोनीने पंचाकडून चेंडू घेतल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून त्याबद्दल तर्क वितक्त लावण्यात येत होते. मात्र धोनीचे संघातील स्थान कायम असून त्याने निवृत्त होण्याचा प्रश्नच येत नाही अशा शब्दात शास्त्रींनी सर्वांना ठणकावले आहे. 

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने केलेल्या संथ खेळीमुळे त्याच्यावर अनेक तज्ज्ञांनी टिकांचा भडिमार केला. मात्र शास्त्रीने धोनी हा संघासाठी मोलाचा खेळाडू असल्याचे सांगितले. ''या सर्व चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. जवळपास 45 षटकांनंतर चेंडूची झालेली झिज अरुणला दाखवण्यासाठी धोनीने चेंडू मागितला होता.'' असे शास्त्रींनी स्पष्ट केले.

loading image