धोनी लवकरच वनडेमधून निवृत्त होऊ शकतो : शास्त्री 

वृत्तसेवा
Friday, 10 January 2020

  • धोनीचा फिटनेस कपिल देवांसारखा

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. मात्र, यंदाच्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी केल्यास तो ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्‍वकरंडकही खेळेल, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धोनीसाठी टी-20 संघाचे दरवाजे उघडे असले तरीही तो संघावर स्वतःला लादणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ""माझं आणि धोनीचं बोलणं झालं आहे. त्याने बराच काळ भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळ केला आहे आणि त्याचा सर्वांनी आदर करायला हवा. त्याने कसोटीतून याआधीच निवृत्ती घेतली आहे. आता तो लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेईल. त्याचे आताचे वय पाहता त्याला फक्त टी-20 क्रिकेटचा पर्याय आहे. त्यासाठी त्याला पुन्हा सरावाला लागण्याची गरज आहे.'' 

जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

धोनी कधीच गरज नसताना संघावर स्वतःला लादणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ""धोनीबद्दल मी एक गोष्ट नक्की सांगतो, तो स्वतःला संघावर कधीच लादणार नाही. त्याला जर वाटले की पुनरागमनात काही अडचणी येत आहेत, त्याने कसोटी क्रिकेटमधून जशी कोणालाही न सांगता निवृत्ती घेतली होती तसेच तो आताही करू शकतो.'' 

मध्यमवर्गीयांना बजेट बिघडणार; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ

धोनीचा फिटनेस कपिल देवांसारखा 
धोनीच्या फिटनेसला शास्त्रींनी कपिल देवांच्या फिटनेसची उपमा दिली आहे. ते म्हणाले, ""माझ्या मते धोनी कपिल देवांसारखा आहे. कपिलसारखेच धोनीलाही संपूर्ण कारकिर्दीत कधीच तंदुरुस्तीने सतावले नाही. कपिलच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काही वर्षांतही त्यांचा फिटनेस उत्तम होता. एकदिवसीय क्रिकेट त्याकाळी असते तर कपिल नक्कीच आणखी दोन वर्षे खेळला असता.'' 

ब्रेकिंग : सोने-चांदीच्या भावात घसरण; पाहा आजचे भाव 

निवड अनुभवाच्या आधारावर 
शास्त्री म्हणाले, "मधल्या फळीत फलंदाजांची निवड करताना फॉर्म आणि अनुभव हे प्रमुख घटक असतील. धोनी, रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांमध्ये निवड होईल. धोनी आयपीएलमध्ये चांगला खेळला तर तो नक्कीच या शर्यतीत असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhoni may retire from ODI soon says Ravi Shastri