वीस विकेट पडल्याने धोनीची क्‍यूरेटरशी चर्चा

पीटीआय
गुरुवार, 2 मार्च 2017

कोलकता - पुण्यातील खेळपट्टीवर गवताचे पातेही न ठेवल्यावरून निर्माण झालेल्या वादाचा वणवा कोलकत्यामधील ईडन गार्डन्सपर्यंत पोचला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेतील सामन्यात ५२.४ षटकांतच वीस विकेट पडल्या. यात झारखंडची सौराष्ट्राविरुद्ध सरशी झाली; पण सामना संपताच झारखंडचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ईडनचे क्‍यूरेटर सुजन मुखर्जी यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी तो काही वेळा तावातावाने बोलल्याचे जाणवले.

प्रथमच फलंदाजी करताना झारखंडचा डाव २७.३ षटकांत १२५ धावांत आटोपला. त्यानंतर सौराष्ट्राची २५.१ षटकांत ८३ धावांत गाळण उडाली. धोनीने २३ धावा केल्या. धोनीने चेंडू भरमसाट सीम झाल्याचे मुखर्जी यांना सांगितले. मुखर्जी यांनी मात्र सांगितले की, आमच्या चर्चेवरून फार टोकाचे तर्क काढले जाऊ नयेत. ही खेळपट्टी सीम गोलंदाजीला पोषक होती, पण त्याने तक्रार केली नाही. स्वतः मी सुद्धा खेळपट्टीविषयी समाधानी नाही. धोनी १९ वर्षांखालील गटात खेळायचा तेव्हा मी पूर्व विभागाचा प्रशिक्षक होतो. या स्पर्धेतील मागील सामन्याच्या वेळी मी येथे नव्हतो. त्यामुळे तो मला भेटायला आला. या लढतीत झारखंडचा सलामीवीर ईशान किशनच्या ५३ धावा सर्वाधिक ठरल्या.

Web Title: Dhoni's curators discussed after twenty wickets