धोनी, तुझं अर्धशतक झालंय.. विसरला का..? 

Tuesday, 15 January 2019

ऍडलेड : महेंद्रसिंह धोनीला वैयक्तिक धावसंख्येचे किंवा विक्रमाचे काहीही घेणं-देणं नसतं.. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आज पुन्हा हेच दिसून आलं. 

मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय आवश्‍यक होता. 299 धावांचे आव्हान तसे आवाक्‍यात होते; पण पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नव्या गोलंदाजांनी दिलेल्या धक्‍क्‍यामुळे थोडी साशंकता होती. अशात विराट कोहलीच्या अफलातून खेळीला साथ देताना धोनीने सुरवातीला संयमी फलंदाजी केली. कोहलीचा धडाका एका बाजूनं सुरूच होता. शतक झळकाविल्यावर कोहली बाद झाला. 

मग दिनेश कार्तिक मैदानात आला. त्याने केवळ 14 चेंडूंमध्येच 25 धावा चोपत आवश्‍यक धावगती आवाक्‍यात आणली. धोनीने 'अँकर'ची भूमिका बजावत भारतीय संघाला विजयापर्यंत नेले. त्याने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतकही झळकाविले. पण त्याला याचे काहीही कौतुक नव्हते. 

किंबहुना, स्वत:चे अर्धशतक पूर्ण झाले आहे, हेच त्याला माहीत नव्हते. नॉन स्ट्रायकर असलेल्या कार्तिकने धोनीचे अभिनंदन केले.. एरवी अर्धशतक किंवा शतक झाल्यावर फलंदाज ड्रेसिंग रूम आणि प्रेक्षकांना बॅट उंचावून अभिवादन करतात. पण धोनीनं असलं काहीच केलं नाही. मग कार्तिकनंच त्याला बॅट उंचावण्याची आठवण करून दिली आणि मग धोनीनं बॅट उंचावून अभिवादन केलं.. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dinesh karthik reminds MS dhoni to raise his bat after half century