मुझे माफ करो; ठाकूरांचे न्यायालयासमोर लोटांगण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपाप्रकरणी बिनशर्त माफी मागण्याची वेळ "बीसीसीआय'चे पदच्युत अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यावर आली. त्यांच्याविरुद्ध अवमानप्रकरणी 17 एप्रिल रोजी सुनावणी होईल. त्यादिवशी व्यक्तिशः उपस्थित राहण्यापासून त्यांना सूट देण्यात आली.

याआधी दुसऱ्या एका प्रकरणात न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांना माफी मागावी लागली होती. सकृतदर्शनी तसा आरोप झाल्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी बिनशर्त माफी मागितली होती. दहा फेब्रुवारी रोजी ठाकूर यांनी वकिलांमार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांनी म्हटले आहे की, शपथेवर साक्ष देणारा नम्रपणे नमूद करतो की, अवमानाचा कदापि उद्देश नव्हता, पण तसा समज निर्माण झाला असेल तर सुरवातीलाच बिनशर्त माफी मागत आहे.

शपथेवर साक्ष देणारा लोकप्रतिनिधी आहे. तो लोकसभेवर तीन वेळा निवडून आला आहे. तरुण वयाचा असल्यापासून तो सार्वजनिक क्षेत्रात वावरत आहे. सन्माननीय न्यायालयाविषयी त्यांना परमोच्च आदर वाटतो. न्यायालयास कमी लेखणारी कोणतीही गोष्ट ते कदापि करणार नाहीत, असा युक्तिवादही ठाकूर यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. आपली बाजू मांडताना ठाकूर यांनी घटनाक्रम तसेच "आयसीसी'शी ई-मेलद्वारे झालेल्या संवादाचा तपशीलही सादर केला आहे.

Web Title: Do forgive me; thakur the ground before the court