'आयपीएल'मध्येही आता 'डीआरएस'चा वापरणार!

वृत्तसंस्था
Wednesday, 21 March 2018

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरली जाणारी 'डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम' (डीआरएस) यंदाच्या 'इंडियन प्रीमिअर लीग'मध्येही (आयपीएल) वापरली जाणार आहे. 'आयपीएल'चा यंदा 11 वा मोसम आहे. 'आयपीएल'मध्ये 'डीआरएस'चा प्रथमच वापर होणार आहे. 

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरली जाणारी 'डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम' (डीआरएस) यंदाच्या 'इंडियन प्रीमिअर लीग'मध्येही (आयपीएल) वापरली जाणार आहे. 'आयपीएल'चा यंदा 11 वा मोसम आहे. 'आयपीएल'मध्ये 'डीआरएस'चा प्रथमच वापर होणार आहे. 

"या स्पर्धेत 'डीआरएस'चा वापर करण्याची कल्पना गेल्या अनेक वर्षांपासून विचाराधीन होती. यंदा प्रथमच ही पद्धत वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे', अशी माहिती 'आयपीएल'चे अध्यक्ष राजीव शुक्‍ला यांनी दिली. या निर्णयानुसार, 'आयपीएल'मधील प्रत्येक डावात दोन्ही संघांना पंचांच्या निर्णयाविरुद्ध 'थर्ड अंपायर'ची मदत मागण्याची प्रत्येकी एक संधी मिळणार आहे. देशांतर्गत ट्‌वेंटी-20 स्पर्धेमध्ये 'डीआरएस'चा वापर करणारी 'आयपीएल' ही जगातील दुसरी स्पर्धा ठरली आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या 'पाकिस्तान प्रीमिअर लीग'मध्ये याचा वापर झाला होता. 

यंदाची 'आयपीएल' स्पर्धा 7 एप्रिल ते 27 मे या कालावधीत होणार आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विशाखापट्टणम येथे झालेल्या 'बीसीसीआय'च्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली होती. तसेच, देशातील सर्वोत्तम दहा पंचांसाठी 'डीआरएस'संदर्भात मार्गदर्शन शिबीरही आयोजित करण्यात आले होते. या पंचांना 'आयसीसी'चे पंचांचे प्रशिक्षक डेनिस बर्न्स आणि ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रॅफेल यांनी मार्गदर्शन केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DRS will be used in IPL 11 announces Rajeev Shukla