इंग्लंडचीच आयपीएलला पसंती

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

इंग्लंड संघ - ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टॉ, जेक बेल, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, ऍलेक्‍स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, ज्यो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्‍स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्‍स, मार्क वूड.

लंडन - चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा संघ आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे; परंतु जॉस बटलर, बेन स्टोक्‍स व ख्रिस वोक्‍स या तीन खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या मालिकेऐवजी आयपीएलमध्ये खेळण्याची मुभा इंग्लंडने दिली आहे.

मात्र, हे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी 15 मे रोजी इंग्लंडला परततील. आयपीएल स्पर्धा 21 मे रोजी संपत आहे. 

इंग्लंड संघ - ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टॉ, जेक बेल, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, ऍलेक्‍स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, ज्यो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्‍स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्‍स, मार्क वूड.

Web Title: England announce 15-man squad for Champions Trophy 2017