इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर विजय

वृत्तसंस्था
Friday, 15 June 2018

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 47 षटकांत 214 (ग्लेन मॅक्‍सवेल 62, ऍश्‍टन ऍघर 40, लियाम प्लंकेट 3-42, मोईन अली 3-43, आदिल रशिद 2-36) प. वि. इंग्लंड 44 षटकांत 7 बाद 218 (ज्यो रुट 50, मोईन अली 69, डेव्हिड विली नाबाद 35, स्टॅनलेक 2-44, नेसेर 2-46, टाय 2-42) 

लंडन - डेव्हिड विलीच्या नाबाद 35 धावांच्या उपयुक्त खेळीने इंग्लंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा डाव 47 षटकांत 214 धावांत आटोपला. ग्लेन मॅक्‍सवेल (62) आणि ऍश्‍टन ऍगर (40) यांच्यामुळेच त्यांना द्विशतकी मजल शक्‍य झाली. त्यानंतर 215 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड 3 बाद 38 असे अडचणीत आले होते. त्यानंतर प्रथम ज्यो रुट (50), मोईन अली (69) यांच्या खेळीनंतर शेवटी डेव्हिड विलीच्या 41 चेंडूंतील नाबाद 35 धावांची खेळी इंग्लंडसाठी निर्णायक ठरली.

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 47 षटकांत 214 (ग्लेन मॅक्‍सवेल 62, ऍश्‍टन ऍघर 40, लियाम प्लंकेट 3-42, मोईन अली 3-43, आदिल रशिद 2-36) प. वि. इंग्लंड 44 षटकांत 7 बाद 218 (ज्यो रुट 50, मोईन अली 69, डेव्हिड विली नाबाद 35, स्टॅनलेक 2-44, नेसेर 2-46, टाय 2-42) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England beat Australia