चौथा एकदिवसीय सामना जिंकत इंग्लंडची विजयी घौडदोड कायम

वृत्तसंस्था
Friday, 22 June 2018

इंग्लडच्या दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाला गुरुवारी (ता.21) सलग चौथ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत होण्याची नामुष्की आली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली. 

चेस्टर-ले-स्ट्रीट : इंग्लडच्या दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाला गुरुवारी (ता.21) सलग चौथ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत होण्याची नामुष्की आली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली. 

डरहॅमच्या चेस्टर-ले-स्ट्रीटवरील रिवरसाईड ग्रांउडवर या मालिकेतील चौथा सामना खेळला गेला आणि यावेळीही फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अॅरोन फिंच आणि शॉन मार्श या दोघांनी केलेल्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ बाद 310 धावा केल्या. 

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड घेतली. प्रचंड फॉर्ममध्ये असलेल्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी 23.4 षटकांत 174 धावांची भागीदीरी करत इंग्लंडचा विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यापूर्वी इंग्लंडचा गोलंदाज डेव्हिड विली याने सात षटकांमध्ये 43 धावा देत सर्वाधिक चार गडी बाद केले. 
इंग्लंडने पाच सामन्यांची मालिका याआधीच जिंकली आहे. आता अखेरचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England beat Australia in fourth consecutive ODI