इंग्लंड संघात अँडरसन, स्टोक्स, रशीदचे पुनरागमन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

लंडन - पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्यात दिवशी पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जेम्स अँडरसन, बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांचा समावेश केला आहे. 

पाकिस्तानने लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 75 धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या दोन्ही संघामधील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर खेळविला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी 14 जणांचा संघ घोषित केला आहे.

जेम्स अँडरसनने लँकेशायरकडून आणि स्टोक्सने डरहॅमकडून खेळताना आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. अँडरसनने 22 षटके गोलंदाजी करत तीन बळी मिळविले. तर, स्टोक्सही श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरला आहे. रशीदचा मोईन अलीला पर्याय म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. 

Web Title: England v Pakistan: James Anderson, Ben Stokes, Adil Rashid are recalled