भारताची पुन्हा प्रथम फलंदाजी;रिषभ पंत खेळणार

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

दुसऱ्या सामन्यामध्ये भरवशाचा ब्रिटीश फलंदाज रुट याला पायचीत बाद देण्याचा वादग्रस्त निर्णय देणारे पंच शमसुद्दीन हे या सामन्यात "थर्ड अम्पायर' म्हणून काम पाहणार आहेत

बंगळूर - भारताविरुद्धच्या तिसऱ्या व निर्णायक ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामन्यामध्ये आज (बुधवार) इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

प्रसिद्ध यष्टिरक्षक व स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रिषभ पंत याचा या सामन्यासाठी संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. ट्‌वेंटी ट्‌वेंटी प्रकारात पदार्पण करणारा पंत सर्वांत तरुण भारतीय खेळाडू आहे. पंत याचे वय 19 वर्षे 120 दिवस इतके आहे. याआधी ट्‌वेंटी ट्‌वेंटी प्रकारात भारताकडून सर्वांत कमी वयात पदार्पण करण्याचा मान जलदगती गोलंदाज इशांत शर्मा याच्या नावावर होता. इशांत याचे वय पदार्पणावेळी 19 वर्षे 152 दिवस इतके होते.

या मालिकेमध्ये भारत व इंग्लंडने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये भरवशाचा ब्रिटीश फलंदाज रुट याला पायचीत बाद देण्याचा वादग्रस्त निर्णय देणारे पंच शमसुद्दीन हे या सामन्यात "थर्ड अम्पायर' म्हणून काम पाहणार आहेत.

या सामन्यासाठी भारतीय संघ असा -
विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत, लोकेश राहुल, सुरेश रैना, युवराज सिंह, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, अमित मिश्रा, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह आणि आशिष नेहरा

या सामन्यासाठी ब्रिटीश संघ असा -

जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, जो रुट, इऑन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्‍स, जोस बटलर, मोईन अली, ख्रिस जॉर्डन, लियान प्लंकेट, अदिल रशीस आणि तायमल मिल्स

Web Title: England wins toss again,to ball