अॅलेक्स हेल्सच्या खेळीने इंग्लंडची मालिकेत बरोबरी

Saturday, 7 July 2018

कार्डिफ : नाणेफेक जिंकल्यावर इंग्लंडचा कप्तान मॉर्गनने विचारपूर्वक गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाजांनी चांगले नियंत्रण ठेवून गोलंदाजी केल्याने भारतीय धावसंख्येला ५ बाद १४८अशी वेसण बसली. इंग्लंडचे प्रमुख फलंदाज बाद होत असताना अॅलेक्स हेल्सने नाबाद अर्धशतक करून इंग्लंडला कार्डीफ सामना जिंकून दिला आणि टी२० मालिकेत १-१ बरोबरी साधून दिली. अॅलेक्स हेल्सलाच सामन्याचा मानकरी ठरवण्यात आले.

अपेक्षेप्रमाणे कार्डीफची खेळपट्टी काहीशी वेगवान गोलंदाजीला मदत करणारी होती. भारतीय डावाला खराब सुरुवात व्हायला ना गोलंदाजी कारणीभूत ठरली ना खेळपट्टी. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने आततायी फटके मारण्याच्या नादात विकेट बहाल केल्या. शिखर धवनने धाव पळताना बॅट जमिनीवर न घासण्याची शाळकरी चूक केली आणि तो धावबाद झाला. ३ बाद २२ धावसंख्येवरून विराट कोहलीने सुरेश रैनाच्या साथीने डगमगणारा डाव थोडा सावरला. 

पहिल्या १० षटकात फक्त ५२ धावा निघाल्या होत्या ज्यावरून गोलंदाजांनी धावसंख्येला लावलेले ब्रेक्स कळतील. कार्डीफच्या मोठ्या मैदानावर सहजी चौकार किंवा षटकार मारता येत नव्हते. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीने मग मोकळ्या जागेत चेंडू ढकलून दुहेरी धावा पळायचा सपाटा लावला. ४७ धावांवर नेमका नको त्या वेळी कोहली बाद झाला. भारतीय फलंदाजांना २० षटकात ५ बाद १४८ची मजल मारता आली. धोनी ५ चौकारांसह नाबाद ३२ धावा केल्या.

कार्डीफच्या खेळपट्टीवर टप्पा पडल्यावर चेंडू थोडासा थांबून येत राहिल्याने फलंदाजांना फटकेबाजी करणे सोपे जात नव्हते. भारतीय गोलंदाजांनी कष्ट करून जेसन रॉय आणि जोस बटलरच्या सलामी जोडीला लवकर तंबूत पाठवले. छोटेखानी खेळी करून कप्तान मॉर्गन बाद झाला तेव्हा शिखरने पकडलेला झेल प्रेक्षणीय होता. शेवटच्या तीन षटकात २३ धावा करायचे आव्हान राहिले असताना मुख्य जबाबदारी चांगली फलंदाजी करणार्‍या अॅलेक्स हेल्सवर होती.  

दोन मोठे षटकार ठोकून दहशत पसवणार्‍या जॉनी बेअर्स्टोला भुवनेश्वर कुमारने १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. शेवटच्या दोन षटकात २० धावा करायच्या होत्या. अॅलेक्स हेल्सने नाबाद अर्धशतक करून संघाला विजय मिळवून दिला.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England won the 2nd T20 match