इंग्लंडचा प्लंकेट आहे 'या' देशाकडून खेळण्यास इच्छुक

वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट हा अमेरिकेच्या क्रिकेट संघात जाण्याची शक्यता आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडकडून त्याने 42 धावा देत तीन विकेट घेतल्या होत्या. तरीही त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले. आता तो अमेरिकेच्या संघाकडून खेळणार असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार अमेरिका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीन हिगींन्स यांच्याशी त्याची संघ बदलाबद्दल चर्चा सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार नुसार एखादा खेळाडू किमान तीन वर्षे पूर्वीच्या संघाकडून खेळला नसला तर त्याला दुसऱ्या देशाकडून खेळता येते. त्यामुळे या नियमांनुसार प्लंकेटला 2022मध्ये अमेरिकेकडून खेळता येऊ शकते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Englands Liam Plunkett In Talks To Play For USA Cricket Team