मैदानात 'पाय' निखळूनही त्याने अडविला चौकार

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

दुबई - जिद्द असेल तर मनुष्य कोणत्याही मैदानावर बाजी मारु शकतो, याचीच प्रचिती अपंग क्रिकेटपटूंच्या स्पर्धेत पहायला मिळाली. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा क्षेत्ररक्षण करताना कृत्रिम पाय निखळला तरी चौकार अडविला.

दुबईत 24 ऑक्टोबरला झालेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजाने मारलेला चेंडू अडविताना इंग्लंडचा क्रिकेटपटू लिअॅम थॉमस हा पडला. पण, त्यावेळी त्याचा उजवा कृत्रिम पाय निखळून पडला. पण, त्या परिस्थितीतही तो पुन्हा उठला आणि एका पायावर लंगडत चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकला. थॉमसच्या या कामगिरीचे क्रिकेटप्रेमींकडून कौतुक होत आहे. इंग्लंडला हा सामना तीन विकेटने गमवावा लागला असला तरी थॉमसच्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली.

थॉमस म्हणाला, की हे सर्व अचानक घडले. चेंडू अडविताना माझा हात चेंडूवरून निसटला. त्यामुळे मी पायावर कोसळलो. पुन्हा उठताना मला जाणविले की पाय निखळून पडला आहे. पण, माझे लक्ष्य चेंडूवर असल्याने मी तसाच एका पायावर चेंडूजवळ पोहचलो आणि चेंडू टाकला.

Web Title: English cricketer loses artificial leg midgame, keeps going

व्हिडीओ गॅलरी