पंचांमुळे आम्ही हरलो - इयान मॉर्गन

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

पुढच्या सामन्यापूर्वी चूका सुधारण्याची आमच्याकडे संधी आहे. त्यामुळे आम्ही खराब पंचगिरीबद्दल तक्रार दाखल करणार आहोत. ट्वेंटी-20 मध्ये डीआरएसचा वापर का करण्यात आलेला नाही, हे मला समजले नाही.

नागपूर - भारताविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात अखेरच्या षटकात ज्यो रुटला पायचीत बाद देणारे पंच शामसुद्दीन यांच्याविरुद्ध इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

इयान मॉर्गनने भारताकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पंचांनी घेतलेल्या निर्णयाच्या दर्जाबाबत निराशा व्यक्त केली. संघ व्यवस्थापनाकडून सामनाधिकाऱ्यांकडे याबाबत आवाज उठविण्यात येणार आहे. ज्यो रुटच्या बॅटला लागून चेंडू पॅडवर लागल्यानंतर शामसुद्दीन यांनी त्याला पायचीत बाद दिले होते. या निर्णयामुळे सामन्याला कलाटणी मिळाली, असे इंग्लंडच्या व्यवस्थापनाचे मत आहे.

मॉर्गन म्हणाला, की पुढच्या सामन्यापूर्वी चूका सुधारण्याची आमच्याकडे संधी आहे. त्यामुळे आम्ही खराब पंचगिरीबद्दल तक्रार दाखल करणार आहोत. ट्वेंटी-20 मध्ये डीआरएसचा वापर का करण्यात आलेला नाही, हे मला समजले नाही. अनेक निर्णय आमच्याविरोधात गेल्याने आम्ही सामना जिंकण्यापासून दूर राहिलो. हे खूप निराशाजनक होते.

Web Title: Eoin Morgan to complain against umpire Shamshuddin for 'hammer blow' wrong decision