मॉर्गन, हेल्सचा बांगलादेश दौऱ्यावर जाण्यास नकार

वृत्तसंस्था
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

लंडन - इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि सलामीवीर ऍलेक्स हेल्स यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे.

मॉर्गन आणि हेल्स यांनी इंग्लंड क्रिकेट मंडळाला (ईसीबी) याबाबतचा निर्णय कळविला आहे. इंग्लंडचा बांगलादेश दौरा 30 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात इंग्लंडचा संघ दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. जुलैमध्ये बांगलादेशमध्ये एका कॅफेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 18 परदेशी नागरिकांना ठार मारण्यात आले होते. याच कारणावरून मॉर्गन आणि हेल्ससाठी यांना बांगलादेशात जाण्यास नकार दिला आहे.

इंग्लंड क्रिकेटचे प्रमुख अॅण्ड्रुयू स्ट्रॉस म्हणाले की, आम्ही मॉर्गन आणि हेल्स यांचा निर्णय समजून घेऊ शकतो. बांगलादेश दौऱ्यासाठी त्यांनी नकार दिल्यामुळे आम्ही निराश झालो आहोत. आम्ही सुरक्षेबाबत खेळाडूंबरोबर सर्व पातळ्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत. या दौऱ्यासाठी शुक्रवारी संघनिवड होणार आहे. त्यापूर्वी निर्णय घेण्यात येईल. आम्ही बांगलादेशमधील सुरक्षेवर लक्ष ठेवून आहोत.

Web Title: Eon Morgan, Alex Hales refused to tour Bangladesh