INDvsNZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी पृथ्वी फिट (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. त्यामुळे आता तो न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारत अ संघात दाखल होईल. रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन त्याने तंदुरु्स्तीवर भर दिला. 

मुंबई : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. त्यामुळे आता तो न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारत अ संघात दाखल होईल. रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन त्याने तंदुरु्स्तीवर भर दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याने नेटमध्ये सरावालाही सुरवात केली आहे. त्याने स्वत: त्याच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारत अ संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन चार दिवांचे सामने खेळणार आहे.  

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळणार आहे. यातील पहिली कसोटी 21 फेब्रुवारीला सुरु होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी  भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघ 19 जानेवारीला निवडला जाणार आहे. पृथ्वीने पहिल्या रणजी सामन्यात 202 आणि 66 धावा केल्या होत्या. नऊ महिन्यांची बंदी संपवून परतल्यापासून तो चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पुनरागमनामुळे  कसोटी संघ निवडताना त्याचाही विचार केला जाऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fit-again Prithvi Shaw set to join India A squad in New Zealand