बाद फेरीच्या दोन जागांसाठी पाच संघ शर्यतीत 

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

आयपीएलच्या नव्या मोसमात आता रंगत निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सनरायझर्स हैदराबाद संघ बाद फेरीत पोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज उंबरठ्यावर आहे. मात्र, अन्य दोन जागांसाठी मात्र पाच संघ शर्यतीत आहेत. 
गुणतक्‍त्यात सध्या तीन संघांचे 12 गुण आहेत, तर गतविजेता मुंबई आणि बंगळूर संघांचे दहा गुण आहेत. क्रिकेट हा नेहमीच अनिश्‍चिततेचा खेळ राहिल्यामुळे यांपैकी कोणत्याही दोन संघांना बाद फेरीचे तिकीट मिळू शकते. 

 

नवी दिल्ली - आयपीएलच्या नव्या मोसमात आता रंगत निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सनरायझर्स हैदराबाद संघ बाद फेरीत पोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज उंबरठ्यावर आहे. मात्र, अन्य दोन जागांसाठी मात्र पाच संघ शर्यतीत आहेत. 
गुणतक्‍त्यात सध्या तीन संघांचे 12 गुण आहेत, तर गतविजेता मुंबई आणि बंगळूर संघांचे दहा गुण आहेत. क्रिकेट हा नेहमीच अनिश्‍चिततेचा खेळ राहिल्यामुळे यांपैकी कोणत्याही दोन संघांना बाद फेरीचे तिकीट मिळू शकते. 

अशी आहे पाच संघांना संधी 

कोलकता - सध्या तिसऱ्या स्थानी. सलग दोन पराभवानंतर पंजाबविरुद्ध मोसमातील सर्वोच्च धावसंख्या उभारून मुसंडी. राजस्थानविरुद्ध विजय मिळविल्यास त्यांचे 14 गुण. त्यामुळे बाद फेरीची सर्वाधिक संधी. शेवटचा सामना राजस्थानकडून हरले तरी संधी राहील. त्यासाठी राजस्थान किंवा पंजाब त्यांचा अखेरचा सामना हरायला हवे. 

राजस्थान - सलग तीन विजय मिळवून पहिल्या चारांत. उर्वरित दोन्ही सामने जिंकून सोळा गुणांसह बाद फेरी गाठण्याचा प्रयत्न; पण कोलकता त्यांच्यापुढे जाऊन उपयोग नाही. कारण, निव्वळ धावगती त्यांना मदत करू शकणार नाही. 

पंजाब - ख्रिस गेल, लोकेश राहुल, ऍण्ड्रयू टाय आणि मुजीब उर रहमान यांच्यामुळे एकवेळ बाद फेरी निश्‍चित मानली जात होती; पण त्यानंतर केवळ एकच विजय मिळाल्याने अडचणीत. राहुल आणि गेल यांच्यावर प्रामुख्याने मदार. एकत्रित कामगिरी आवश्‍यक. त्यासाठी मुंबई, पंजाबवर विजय आवश्‍यक. 

मुंबई - अखेरचे दोन सामने कुठल्याही परिस्थितीत जिंकायलाच हवेत. उद्या पंजाबविरुद्ध हरल्यास आव्हान संपुष्टात. दोन्ही सामने जिंकल्यानंतरही संकट राहिल्यास निव्वळ धावगती मदतीस येईल. 

बंगळूर - सध्या सातव्या स्थानावर असले तरी, दोन मोठे विजय त्यांना बाद फेरीत घेऊन जाऊ शकतील. इथे दोन्ही सामने जिंकणे आणि ते देखील मोठ्या फरकाने हे महत्त्वाचे आहे. असे झाल्यास समान गुण होतील आणि निव्वळ धावगती फायद्याची ठरेल. 

Web Title: five teams are in race for playoffs