esakal | वेळेत षटके पूर्ण होत नसल्याची फ्लेमिंग यांच्याकडून कबुली 
sakal

बोलून बातमी शोधा

Fleming confesses that the overs are not over in time

यंदाच्या आयपीएलमध्ये निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली जात नाहीत, ही मुख्य चिंता राहिली आहे, हे चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मान्य केले; मात्र उष्ण आणि आर्द्रता असलेले वातावरण आणि त्यामुळे खेळाडूंचा मैदानावरचा वावर संथ होत असल्याने सामने वेळेत पूर्ण होत नसल्याचे ते म्हणाले. 

वेळेत षटके पूर्ण होत नसल्याची फ्लेमिंग यांच्याकडून कबुली 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - यंदाच्या आयपीएलमध्ये निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली जात नाहीत, ही मुख्य चिंता राहिली आहे, हे चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मान्य केले; मात्र उष्ण आणि आर्द्रता असलेले वातावरण आणि त्यामुळे खेळाडूंचा मैदानावरचा वावर संथ होत असल्याने सामने वेळेत पूर्ण होत नसल्याचे ते म्हणाले. 

चेन्नई संघाने हैदराबादला हरवून आयपीएलच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फ्लेमिंग म्हणाले, डगआउटमध्ये बसून मैदानावर किती उष्ण हवामान असते हे आम्हाला जाणवत असते. याचा परिणाम खेळाडूंवर होत असल्यामुळे मुंबई आणि ठिकाणचे सामने उशिरापर्यंत चालत असतात. एखाद्या फलंदाजाने अधिक काळ फलंदाजी केली की त्यालाही अशा वातावरणाचा सामना करावा लागत असतो. 

हैदराबादविरुद्धच्या रंगलेल्या सामन्यात चेन्नईच्या विजयात निर्णायक फलंदाजी करणाऱ्या फाफ डुप्लेसीबाबत बोलताना फ्लेमिंग यांनी सांगितले, फाफ हा फेरारी कारसारखा आहे. त्याच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते. तो खेळपट्टीवर असताना त्याच्या पद्धतीने खेळ करतो. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे कित्येक कर्णधार आणि संघांना दंड केलेला आहे. हा खरे तर स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे, पण अशा टाइमपासमुळे कसोटी क्रिकेटची घसरण झाली आहे. त्यासाठी खेळाडूंनी जागरूक राहायला हवे, असे फ्लेमिंग म्हणाले. 

यंदाच्या मोसमातला आमचा असा पहिला सामना होता. त्यामध्ये आम्ही वेळेत षटके पूर्ण करू शकलो नाही. कदाचित दडपण आल्यामुळे अधिक वेळ झाला असेल. जेव्हा अधिक विचार केला जात असतो, तेव्हा वेळेचे बंधन पाळले जात नसते, अशी कबुलीही फ्लेमिंग यांनी दिली.

loading image