भारतीय संघावर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव

रविवार, 30 डिसेंबर 2018

गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे.

मेलबर्न : गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाचे खास कौतुक केले आहे. तसेच या विजयात जसप्रीत बुमराचा महत्वाचा वाटा असल्याचेही सचिनने नमूद केले आहे.
 

या विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारतीय नियामक मंडळाबरोबरच अनेक दिग्गजांनी अशा प्रकारे भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
 

 

 

 

 

Web Title: Giving Big Congratulations of the Indian team