भारताची 'विराट' धावसंख्या; कोहलीचे द्विशतक

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

मुरली विजयने 282 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 136 धावा केल्या. तर जयंत यादवने 15 चौकारांसह 204 चेंडूत 104 धावा केल्या. विराट, विजय आणि जयंत यांनी केलेल्या महत्वपूर्ण खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.

मुंबई - भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत येथे सुरु असलेल्या इंग्लंविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात 25 चौकार आणि एका षटकारासह 340 चेंडूत 235 धावा जोडल्या आहेत. शिवाय मुरली विजय आणि जयंत यादव यांनीही शतकी खेळी केल्याने भारतीय संघाने सर्वबाद 631 धावा करत 231 धावांची आघाडी घेतली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने एक बाद 13 धावा केल्या आहेत.

मुरली विजयने 282 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 136 धावा केल्या. तर जयंत यादवने 15 चौकारांसह 204 चेंडूत 104 धावा केल्या. विराट, विजय आणि जयंत यांनी केलेल्या महत्वपूर्ण खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. पहिल्या डावात इंग्लंडनेही मजबूत सुरुवात केली होती. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यापासून भारतीय गोलंदाजांनी सुरेख खेळ करत त्यांना रोखले. रविचंद्रन अश्‍विनने सहा गडी बाद केले तर उर्वरित चार गड्यांना बाद करण्यात रविंद्र जडेजा यशस्वी ठरला. त्यामुळे इंग्लंडला 400 धावातच रोखण्यात यश मिळाले.

धावफलक
पहिला डाव
इंग्लंड: सर्वबाद 400 धावा
भारत: सर्वबाद 631 धावा

दुसरा डाव
इंग्लंड: एक बाद 12 धावा (खेळ सुरु आहे)

Web Title: Great score of india;