‘आरपी’च्या गोलंदाजीचा गुजरातला सहारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नागपूर - दुसऱ्या नव्या चेंडूवर गुजरातच्या फलंदाजीला लगाम घातल्यानंतर फलंदाजीत आश्‍वासक सुरवात करणाऱ्या झारखंडला दुसऱ्या दिवसअखेरीस रोखण्यात गुजरातला आयात केलेल्या आर. पी. सिंगच्या गोलंदाजीचा सहारा मिळाला. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर सुरू असलेल्या या रणजी उपांत्य लढतीत दुसऱ्या दिवशी कुणा एका संघाचे वर्चस्व राहिले नाही. गुजरातचे मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न आज भंग पावले. त्यानंतर झारखंडची चांगल्या सुरवातीनंतर दिवसअखेरीस ५ बाद २१४ असी पडझड ढाली. झारखंड संघ अजूनही १७६ धावांनी मागे असून, इशांक जग्गी हा एकमेव विशेषज्ज्ञ फलंदाज खेळपट्टीवर आहे. 

दुसऱ्या नव्या चेंडूवर गुजरातची फलंदाजी आज कोलमडली. पहिल्या दिवसअखेरच्या ३ बाद २८३ वरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर आज त्यांचा दुसरा डाव आणखी १०७ धावांचीच भर घालून संपुष्टात आला. नाबाद शतकवीर प्रियांक पांचाळ (१४९) आज वैयक्तिक धावसंख्येत केवळ पाच धावांची भर घालून बाद झाला. त्यांचे अन्य फलंदाजही झटपट बाद झाले. तळात आर. पी. सिंगने केलेल्या ४० धावांच्या खेळीने त्यांना चारेशाच्या जवळपास मजल मारणे शक्‍य झाले. 

त्यानंतर झारखंडला पहिल्याच षटकात झटका बसला. ‘आरपी’ने सुमीत कुमारला (२) बाद करून झारखंडची सलामीची जोडी फोडली. झारखंडची सुरवात अपेक्षेप्रमाणे चांगली झाली नाही. त्यानंतर प्रत्युष सिंग, विराट सिंग, सौरभ तिवारी आणि ईशान किशन यांनी कमी अधिक प्रमाणात झारखंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. किशनने वेगवान अर्धशतकी खेळी केली. मात्र, मोठी भागीदारी न झाल्यानेच त्यांचा डाव रखडला. त्यामुळेच चांगली सुरवात होऊनही केवळ इशांक जग्गीच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे झारखंडला प्रतिकार कायम ठेवता आला. तिसऱ्या दिवशी आता उद्या जग्गीवरच झारखंडच्या आशा अवलंबून राहणार आहेत. 

संक्षिप्त धावफलक 
गुजरात पहिला डाव : १२६.२ षटकांत सर्वबाद ३९० (प्रियांक पांचाळ १४९, पार्थिव पटेल ६२, आर. पी. सिंग ४०, भार्गव मेराई ३९, रुजुल भट्‌ट २३, 
मनप्रीत जुनेजा २२, चिराग गांधी २०, अजय यादव ३/६७, राहुल शुक्‍ला ३/७१, विकास सिंग २/५९, शाहबाज नदीम १-१०६, कौशल सिंग १-६१). 
झारखंड पहिला डाव : ५१ षटकांत ५ बाद २१४ (ईशान किशन ६१, इशांक जग्गी खेळत आहे ४०, सौरभ तिवारी ३९, विराट सिंग ३४, प्रत्युष सिंग २७, आर. पी. सिंग ३-४८, रुजुल भट्‌ट १-३७, एच. पटेल १-१४५).

Web Title: gujrat jharkhand ranaji karandak cricket match