esakal | धोनीच्या फिनिशिंगवर आणखी किती दिवस प्रश्न : कोहली
sakal

बोलून बातमी शोधा

Hailed as one of the best finishers in limited overs Dhoni says kohali

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संथ गतीने फलंदाजी केल्यामुळे त्याच्यावर टीका होत असताना त्याच्या बचावासाठी कर्णधार विराट कोहली धावला आहे. धोनीच्या फिनिशिंग टचवर आणखी किती दिवस प्रश्न उपस्थित करणार असे कोहलीने म्हटले आहे. 

धोनीच्या फिनिशिंगवर आणखी किती दिवस प्रश्न : कोहली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संथ गतीने फलंदाजी केल्यामुळे त्याच्यावर टीका होत असताना त्याच्या बचावासाठी कर्णधार विराट कोहली धावला आहे. धोनीच्या फिनिशिंग टचवर आणखी किती दिवस प्रश्न उपस्थित करणार असे कोहलीने म्हटले आहे. 

या सामन्यात भारताला विजयासाठी षटकामागे सरासरी 8-9 च्या गतीने धावा काढायच्या असतानादेखील धोनीने 59 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. अशावेळी सर्वस्तरातून धोनीवर टीका होत असताना भारताचा कर्णधार विराट कोहली मात्र त्याच्या पाठीमागे उभा राहिला आहे. 

मर्यादित षटकांच्या खेळामध्ये धोनी हा सर्वांत चांगला फिनिशर असल्याचेही विराट कोहलीने सांगितले आहे. आजपर्यंत अनेकवेळा त्याने दबावाखाली खेळताना उत्तम खेळी साकारून संघाला विजय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे.

दरम्यान, कालच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने 10000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याने हा टप्पा 320 सामन्यांमध्ये 51.40 च्या सरासरीने पूर्ण केला आहे. भारतातर्फे एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावा कराणारा धोनी हा आता सचिन, गांगुली आणि राहुल द्रविडनंतर चौथा खेळाडू बनला आहे. आतापर्यंत वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनीच दहा हजार धावा करण्याची किमया साधलेली आहे. परंतु, धोनी सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने या सामन्यात यष्टीमागे 300 वा झेल जगातील चौथा यष्टीरक्षक होण्याचीही कामगिरी केली आहे.

loading image
go to top