देव झोपलाय; सेहवागच्या सचिनला हटके शुभेच्छा

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

सेहवागच्या या फोटो ट्विटनंतर प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी सेहवागच्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटले आहे, की मला हे पाहून चांगले वाटले की या फोटोमध्ये देवाचा उजेड तुमच्यावरही पडलेला दिसत आहे. 

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आज (24 एप्रिल) वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, त्याचा सलामीवीर सहकारी वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरून हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

सेहवागने आज सकाळीच सचिनसोबतच एक फोटो ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या. विमानातील हा फोटो असून सेहवागच्या चेहऱ्यावर हसू आहे. तर, सचिन बाजूच्या खुर्चीवर झोपलेला आहे. या फोटोसह केलेल्या ट्विटमध्ये सेहवागने म्हटले आहे, की हा खूप दुर्मिळ क्षण आहे कोणीही कोणताही गुन्हा करू शकतो. कारण, देव झोपला आहे. भारतात वेळ थांबविण्याची क्षमता या माणसात आहे. सचिन वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सेहवागच्या या फोटो ट्विटनंतर प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी सेहवागच्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटले आहे, की मला हे पाहून चांगले वाटले की या फोटोमध्ये देवाचा उजेड तुमच्यावरही पडलेला दिसत आहे. 

Web Title: Happy Birthday Sachin Tendulkar: Virender Sehwag wishes ‘God ji’ in unique manner