मेहनतीनेच संयमी बनलो - पुजारा

पीटीआय
शुक्रवार, 24 मार्च 2017

धरमशाला - संयम हा काही जन्मतःच येत नसतो. त्यासाठी मेहनत करावी लागते. मेहनत करूनच मी संयम राखायला शिकलो, अशी प्रतिक्रिया भारताचा मधल्या फळीतला फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याने व्यक्त केली. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची स्थिती भक्कम करण्यात पुजाराच्या संयमी द्विशतकी खेळीचा वाटा मोठा होता. चौथ्या कसोटीपूर्वी सराव सत्रादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत त्याने संवाद साधला, तेव्हा आपल्या द्विशतकी खेळीविषयी मत मांडले.

रांची कसोटीत प्रथम भारताला अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पुजाराने नंतर जम बसल्यावर जबरदस्त खेळी करून भारताची स्थिती भक्कम केली. दडपणाखाली त्याने तब्बल ७०० मिनिटे फलंदाजी केली. तो म्हणाला, ‘‘कुमार गटात खेळायला लागल्यापासून मला संयम किती महत्त्वाचा हे समजले. तेव्हापासून संयम हा माझ्या फलंदाजीचा एक भाग झाला. प्रदीर्घ खेळी करण्याकडेच माझा कल राहिला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मला त्याचा फायदा झाला. रणजी स्पर्धेत नुसते शतक झळकावून तुमच्याकडे कुणी बघत नाही. शतकानंतर द्विशतक साजरे झाले की चर्चा होते. द्विशतकाचे रूपांतर त्रिशतकात झाले की तुमच्याकडे माना वळायला लागतात. देशांतर्गत स्पर्धांमधून अशीच कामगिरी करून मी राष्ट्रीय संघात दाखल झाला. स्थानिक क्रिकेट खेळताना खेळपट्टीवर टिकून राहण्याची सवय मला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील फायद्याची ठरत आहे.’’

मैदानाबाहेर सुरू असलेल्या वादांवरदेखील पुजाराने आपल्या संयमी खेळीइतकेच संयमाने भाष्य केले. तो म्हणाला, ‘‘विराट कोहलीची तुलना एखाद्या खेळाडूशी होणे समजू शकतो. त्याची तुलना उगाच अन्य कुणाबरोबर करायची आणि मग वाद उरकत बसायचे यात काही अर्थ नाही. विराट केवळ महान खेळाडू नाही, तर तो क्रिकेटचा ब्रॅंड ॲम्बेसिडर आहे. मैदानाबाहेर काय चालू आहे, याकडे आमचे लक्ष नाही. चालू मोसमातील अखेरचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आतापर्यंत आमची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. त्याची सांगतादेखील चांगलीच व्हावी, यासाठीच आम्ही प्रयत्नशील राहू.’’

Web Title: Hard work to become abstinent - Pujara