बोगस प्रमाणपत्रामुळे हरमनप्रितला गमवावे लागले 'डीएसपी' पद

वृत्तसंस्था
Tuesday, 10 July 2018

पंजाब सरकारने भारतीय महिला ट्वेंटी20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौर हिच्याकडून पोलिस उपअधिक्षकाचे पद काढून घेण्यात आली. सुत्रांनुसार खोटे पदवी प्रमाणपत्र सादर केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

नवी दिल्ली : पंजाब सरकारने भारतीय महिला ट्वेंटी20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौर हिच्याकडून पोलिस उपअधिक्षकाचे पद काढून घेण्यात आली. सुत्रांनुसार खोटे पदवी प्रमाणपत्र सादर केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

सूत्रांनुसार पंजाब सरकारने तिला पत्र पाठवले आहे. हरमनप्रितची शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास असल्यामुळे तिला फक्त पोलिस कर्मचारी म्हणून काम करावे लागेल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तरी तिची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा पाहता पंजाब सरकारकडून तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे. 

यावर हरमनप्रितचे व्यवस्थापक यांनी खुलासा केला आहे. ''ही तीच पदवी आहे जी हरमनप्रितने रेल्वेमध्ये दाखवली होती त्यामुळे ही खोटी असणे अश्यक आहे. तसेच पंजाब पोलिसांकडून आम्हाला कोणतेही अधिकृत पत्र आलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.'' 

याघटनेबद्दल विचारले असता हरमनप्रित म्हणाली, ''मला याबद्दल कल्पना आहे, सरकारकडून मला सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harmanpreet Kaur stripped of DSP rank over fake degree