चेंडू कुरतडण्याविरुद्ध आणखी तीव्र कारवाई

वृत्तसंस्था
Sunday, 30 September 2018

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू कुरतडण्याच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. त्यासाठी आचारसंहिता आणि खेळविषयक अटी-शर्तींची नवी नियमावली जारी करण्यात आली. चेंडूच्या स्थितीत फेरफार करणे हा आता तिसऱ्या श्रेणीचा गुन्हा ठरेल. त्यासाठी आठ दंडगुणांचे प्रमाण 12 पर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यानुसार सहा कसोटी किंवा 12 वन-डेसाठी बंदी येऊ शकते.
 

दुबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू कुरतडण्याच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. त्यासाठी आचारसंहिता आणि खेळविषयक अटी-शर्तींची नवी नियमावली जारी करण्यात आली. चेंडूच्या स्थितीत फेरफार करणे हा आता तिसऱ्या श्रेणीचा गुन्हा ठरेल. त्यासाठी आठ दंडगुणांचे प्रमाण 12 पर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यानुसार सहा कसोटी किंवा 12 वन-डेसाठी बंदी येऊ शकते.

चेंडू कुरतडण्याशिवाय फसवणूक करून (चिटिंग) अवैध पद्धतीने वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करणे, वैयक्तिक शिवीगाळ, स्पष्ट ऐकू येईल असे अपशब्द, पंचांच्या सूचनांचे पालन न करणे असे शिस्तभंगाचे नवे प्रकारही ठरविण्यात आले. दोन जुलै रोजी डब्लीनला झालेल्या वार्षिक परिषदेत कार्यकारी मंडळाने मान्यता दिलेले बदल 30 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिका- झिंबाब्वे वन-डे सामन्यापासून लागू होतील.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन व्हाइट या त्रिकुटाने चेंडू कुरतडण्याचा गैरप्रकार केला, त्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ माजविलेल्या या प्रकरणानंतर "आयसीसी'ने आपले धोरण आणखी कठोर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harsher punishment for ball tampering