सर्वोच्च क्षणीच खेळ सोडायला आवडेल - विराट 

पीटीआय
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रविवारी पुन्हा एकदा साडेतीनशेहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. कर्णधार विराट कोहलीने यात महत्त्वाची भूमिका बजावताना शतकी खेळी केली. आव्हानाचा पाठलाग करताना सतरावे शतक झळकावताना कोहलीने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. मात्र, सचिनच्या अव्वल स्थानापर्यंत पोचणे कठीण असल्याचे कोहलीने मान्य केले. 

सचिनने ही कामगिरी 232 डावांत केली, तर कोहलीने 96व्या डावांत हे लक्ष्य गाठले. त्यामुळे आता प्रत्येकवेळी विराटची तुलना सचिनशी केली जाणार याची कल्पना आली. एका खासगी वाहिनीसाठी नासिर हुसेन याने घेतलेल्या मुलाखतीत कोहली म्हणाला, ""सचिनने गाठलेल्या परमोच्च क्षणापर्यंत पोचणे कठीण आहे. तिथपर्यंत पोचण्यासाठीचा मार्गच इतका अडथळ्याचा आहे की मी तो पूर्ण करू शकेन की नाही हे माहीत नाही. 24 वर्षे 200 कसोटी आणि शंभर आंतरराष्ट्रीय शतके सचिनच्या विक्रमातील हे काही आकडेच खूप काही बोलून जातात. मी यापेक्षा काही तरी वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न करेन; पण कारकिर्दीच्या सर्वोच्च क्षणावर असतानाच मला खेळाचा निरोप घ्यायला आवडेल.'' 

अधिक मित्र नसल्याचे आणि आपण अधिक लोकांच्या जवळ नसण्यामुळे मी यशाच्या मार्गावर चालू शकतो, असे कोहलीने या वेळी सांगतिले. तो म्हणाला, ""मी फारसा कुणाच्या जवळचा नसल्याने आणि फारसे मित्रही मला नसल्यामुळे मी स्वतःला नशिबवान समजतो. त्यामुळे मला सरावावर अधिक लक्ष देता येते. चर्चेत किंवा त्यांच्याबरोबर राहण्यात माझा वेळ जात नाही.'' 

आयुष्य जगताना जे करायचे असते, ते मी करत राहतो. त्यावर मर्यादा लादत नाही, असे सांगून तो म्हणाला, ""मुळात खेळाडू म्हणून आधीच माझ्यावर मर्यादा पडलेल्या असतात. मी काय करू शकतो हे माहीत असूनही अनेकदा मला त्या गोष्टी करता येत नाहीत. माझी क्षमता मी मैदानावर अधिक खर्च करत असतो. त्यामुळेच मी आयुष्यात जे काही करायचे आहे, त्यावर मर्यादा घालत नाही. पुढे जाण्यासाठी निर्णय घेण्यात मी योग्य तो समतोल साधतो.''

Web Title: The highest moment like the game away