गतविजेत्या हैदराबादचा बंगळूरवर सोपा विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

हैदराबाद - युवराजसिंग आणि हेन्रिकेज यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर द्विशतकी मजल मारणाऱ्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 35 धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरवात केली.

हैदराबाद - युवराजसिंग आणि हेन्रिकेज यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर द्विशतकी मजल मारणाऱ्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 35 धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरवात केली.

कर्णधार वॉर्नर लवकर बाद झाल्यावर शिखर धवनने 40 धावांची खेळी केली, पण हैदराबादच्या डावाला वेग मिळवून देण्याचे काम युवराज आणि हेन्रिकेज यांनी केले. या दोघांनी 29 चेंडूंत 58 धावांची भागीदारी केली, त्यामुळे गतविजेत्यांनी 207 धावा केल्या.

विराट कोहली आणि एबी डिव्हिलर्स यांच्या अनुपस्थितीत कमकुवत झालेल्या बंगळूरची मदार ख्रिस गेलवर होती. त्याने मनदीपसिंगसह 52 धावांची वेगवान सलामी दिली खरी, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. आशेचा किरण दाखवणारा केदार जाधव धावचीत झाला आणि त्यानंतर त्यांचा विजय कठीण होत गेला.

संक्षिप्त धावफलक - हैदराबाद - 50 षटकांत 4 बाद 207 (डेव्हिड वॉर्नर 14 -8 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, शिखर धवन 40 -31 चेंडू, 5 चौकार, हेन्रिकेज 52 -37 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, युवराजसिंग 62 -27 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार टी. मिल्स 4-0-31-1, चहल 4-022-1) वि. वि. बंगळूर ः 19.4 षटकांत सर्वबाद 172 (ख्रिस गेल 32 -21 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, मनदीपसिंग 24 -16 चेंडू, 5 चौकार, केदार जाधव 31 -16 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, रशिद खान 4-0-36-2, नेहरा 4-0-42-2, भुवनेश्‍वर 4-0-27-2).

Web Title: hyderabad win in ipl