कोहलीबद्दलचा आदर कमी झाला आहे:इयान हिली

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

कोहली ऑस्ट्रेलियाचा पुरेसा आदर ठेवत नसल्याची भावना व्यक्त करत हिली यांनी विराटकडून सध्या दाखविण्यात येत असलेली आक्रमकता त्याने थोडी कमी करावी, असा सल्ला दिला आहे

मेलबर्न- भारतीय कर्णधार विराट कोहली याच्याकडून ऑस्ट्रेलियाविरोधात केले जाणारे स्लेजिंग पाहून त्याच्याविषयी असणारा आदर कमी होत असल्याचे विधान ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक इयान हिली यांनी केले आहे.

कोहली ऑस्ट्रेलियाचा पुरेसा आदर ठेवत नसल्याची भावना व्यक्त करत हिली यांनी विराटकडून सध्या दाखविण्यात येत असलेली आक्रमकता त्याने थोडी कमी करावी, असा सल्ला दिला आहे. विराट याच्या अतिआक्रमक धोरणामुळे त्याच्या सहकाऱ्यांवरील दबाव वाढत असल्याचे मत हिली यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केले. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बंगळूर येथे सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कोहली याच्याकडून आक्रमक धोरण राबविण्यात आल्याचे दिसून आले होते.

याचवेळी, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ व त्याच्यादरम्यान शाब्दिक चकमकही उडाली होती. कोहली याचे स्मिथबरोबरील वर्तन सर्वथा अयोग्य होते, अशी प्रतिक्रिया हिली यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली.

Web Title: I am losing respect for Virat Kohli due to his sledging: Ian Healy