मी तर ‘नाइट वॉचमन’ - राय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर माजी महालेखापाल विनोद राय ‘आपली भूमिका नाइट-वॉचमन’ची असेल, अशी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. 

सर्वोच्च न्यायालयाने आज ‘बीसीसीआय’वर चार प्रशासकीय सदस्यांची नियुक्ती केली. याचे अध्यक्षपद राय यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. प्रशासक म्हणून आपल्या कामात यापूर्वी छाप पाडणारे राय यांनी आपण यासाठी सज्ज असल्याचेच दाखवून दिले. ते म्हणाले,‘‘क्रिकेट प्रशासक म्हणून ‘बीसीसीआय’चे काम पाहताना माझी भूमिका नाइट-वॉचमन’ची असेल. सरळ आणि सुरळीत काम करणारी नवी कार्यकारिणी निवडणे हे माझे काम असेल.’’

या जबबादारीविषयी अधिक बोलताना राय यांनी हा गौरव असल्याचे मत मांडले. ते म्हणाले,‘‘सर्वोच्च न्यायालयाने यासाठी आपल्याला लायक समजले याचा मला अभिमान वाटतो. माझ्या क्षमतेनुसार आपण ही जबाबदारी यशस्वी पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’ क्रिकेटची आवड आणि ओळख असणारे राय म्हणाले,‘‘फलंदाजी करताना जेव्हा एखाद्या संघाचा डाव कोसळतो आणि दिवसाची वेळ तारून न्यायची असते, तेव्हा नेहमीपेक्षा वेगळ्या फलंदाजाला पाठवले जाते. क्रिकेटच्या परिभाषेत त्याला नाइट-वॉचमन म्हणतात. सध्या बीसीसीआयचा डाव गडगडला आहे. तो सांभाळण्यासाठीच माझी नियुक्ती झाली आहे. क्रिकेटची प्रतिमा चांगली आहे. लोकप्रिय आहे. खेळाडू गुणवान आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपण योग्य तोच निर्णय घेऊ.’’

बीसीसीआयची निवडणूक कधी होणार, याविषयी त्यांनी थेट भाष्य टाळले. ते म्हणाले,‘‘अजून काम सुरू व्हायचे आहे. आताच बोलणे योग्य ठरणार नाही. जेव्हा माझ्या हाती काही येईल, तेव्हा मी निश्‍चितपणे सर्व स्पष्ट करेन.’’

Web Title: i am a night watchman