मी फक्त 'पार्ट टाईम' गोलंदाज नाही: केदार जाधव

पीटीआय
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

विशाखापट्टणम: तंत्रशुद्ध फलंदाज ते बदली यष्टिरक्षक इथपासून 'आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जमलेली जोडी फोडण्यासाठी उपयुक्त गोलंदाज' अशी केदार जाधवची ओळख निर्माण झाली आहे. 'कारकिर्दीमध्ये येणारी आव्हाने स्वीकारणे आणि त्याच्या परिणामांची जबाबदारीही स्वीकारणे महत्त्वाचे असते,' असे मत केदार जाधवने आज (शुक्रवार) व्यक्त केले.

न्यूझीलंडविरुद्धच्या चार सामन्यांमध्ये केदार जाधवने 18 षटके गोलंदाजी केली आहे. यात त्याने 73 धावा देत सहा विकेट्‌स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अक्षर पटेल आणि अमित मिश्रा या फिरकी गोलंदाजांच्या आधी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केदार जाधवच्या हाती चेंडू सोपविला होता. हा विश्‍वास सार्थ करत त्याने झटपट दोन फलंदाजही बाद केले होते.

याविषयी केदार जाधव म्हणाला, "आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधाराने चेंडू हाती सोपविला, की ती जबाबदारी पार पाडावी लागतेच. बदली गोलंदाज म्हणून केवळ 'काही षटके भरून काढणे,' असा दृष्टीकोन असूनही चालत नाही. फलंदाजी असो वा गोलंदाजी, प्रत्येकाला संघासाठी जबाबदारी उचलावीच लागते. देशासाठी आपण खेळतो, तेव्हा शक्‍य त्या सर्व मार्गांनी आपले योगदान देणे महत्त्वाचे असते. संघातील पहिल्या चार-पाच फलंदाजांपैकी किमान एकाने चार षटके गोलंदाजी करावी, अशी धोनीची अपेक्षा असते. कारण, एखाद्या सामन्यात प्रमुख गोलंदाजांपैकी कुणाची गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे होत नसेल, तर त्यासाठी 'प्लॅन बी' तयार असणे महत्त्वाचे असते.''

Web Title: I am not just a part-time bowler, says Kedar Jadhav