यामुळेच महेंद्रसिंग धोनी मला आवडतोः सनी लिओनी

वृत्तसंस्था
Friday, 22 March 2019

विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल यांच्यापैकी सनी लिओनी कुणाचे तरी नाव घेईल, असे वाटत होते. पण सनीने क्षणाचाही विलंब न लावता महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच 'कुल' असून, तो कुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असे अभिनेत्री सनी लिओनी हिने एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

एका क्रिकेटच्या संकेतस्थळाचे उद्धाटन सनी लिओनी हिच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तिला, तुझा आवडता क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ती म्हणाली, 'माझा आवडता क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हा आहे. धोनी खूपच शांत असून, तो एक 'फॅमिली मॅन' आहे. धोनीची मुलगी झिवा ही तर फारच सुंदर आहे. धोनी आणि झिवाचे काही फोटो मी पाहिले असून, ते खूपच सुंदर आहेत. त्यामुळे मला सर्व खेळाडूंमध्ये धोनी सर्वात जास्त आवडतो.'

विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल यांच्यापैकी सनी लिओनी कुणाचे तरी नाव घेईल, असे वाटत होते. पण सनीने क्षणाचाही विलंब न लावता महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. सनी लिओनी हि सध्या दोन मालिका, एक हिंदी चित्रपट व दोन दक्षिण चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I like Mahendra Singh Dhoni says Sunny Leone