World Cup 2019 : शमी नको, भुवनेश्‍वरला संधी द्या : तेंडुलकर

वृत्तसंस्था
Wednesday, 26 June 2019

सध्याच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर चांगलाच सक्रिय झाला आहे. त्याच्या मतांची चांगली चर्चा होत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने भारतीय संघ व्यवस्थापनाला वेस्ट इंडीजविरुद्ध महंमद शमीपेक्षा तंदुरुस्त भुवनेश्‍वरला संधी द्यावी, असा सल्ला दिला आहे.
 
वर्ल्ड कप 2019 :
मॅंचेस्टर ः

भारताची उद्या गुरुवारी वेस्ट इंडीजशी लढत होणार आहे. भुवनेश्‍वरच्या गोलंदाजीत विंडीजच्या आक्रमकतेला वेसण घालण्याची क्षमता असल्याचे त्याने म्हटले आहे. सचिन म्हणाला, ""भुवनेशवर तंदुरुस्त झाला, ही नक्कीच शुभ वार्ता आहे. त्याची देहबोली मी पाहिली आहे. तो कमालीच्या आत्मविश्‍वासाने गोलंदाजी करतोय. शमीने आधीच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली असली, तरी विंडीजविरुद्धची लढत लक्षात घेता मी तरी भुवनेश्‍वरला संधी देईन. विंडीज संघ मुळातच आक्रमक आहे. त्यातही गेलची भीती अधिक आहे. गेलला अस्थिर ठेवण्याची क्षमता भुवनेश्‍वरच्या गोलंदाजीत शमीपेक्षा अधिक आहे आणि ते अधिक महत्त्वाचे आहे.'' 

भुवनेश्‍वरने यापूर्वीच्या अखेरच्या कसोटी सामन्यात गेलला कसे जखडून ठेवले होते, हे मी पाहिले आहे. त्यामुळेच मी हे बोलत असल्याचे सचिनने सांगितले. तो म्हणाला, ""शमीला न खेळविण्याचा निर्णय नक्कीच दुर्दैवी आहे. पण, उद्याचा सामना लक्षात घेता भुवीच योग्य वाटतो, या मतावर मी ठाम आहे. आपण स्पर्धेत अजून अपराजित आहोत आणि हाच निकाल कायम ठेवायचा असेल, तर हा निर्णय घ्यायलाच हवा.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I would pick Bhuvneshwar over Shami Sachin Tendulkar ahead of India vs West Indies clash