आयसीसी पुरस्कारांवर 'विराट' बाजी

वृत्तसंस्था
Thursday, 18 January 2018

आयसीसीने आज (गुरुवार) आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली. या वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मायदेशात विजय कामगिरी केली होती. तसेच त्याने धावाही केल्या होत्या. यामुळे त्याला यंदाचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जवळपास सर्वच प्रमुख पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. विराटला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर झाला आहे.

आयसीसीने आज (गुरुवार) आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली. या वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मायदेशात विजय कामगिरी केली होती. तसेच त्याने धावाही केल्या होत्या. यामुळे त्याला यंदाचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणूनही त्याची निवड झाली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी त्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे यंदाच्या आयसीसी पुरस्कारांवर विराटची जादू पहायला मिळत आहे.

सलग दुसऱ्यावर्षी भारतीय क्रिकेटपटूने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविला आहे. गेल्या वर्षी आर. आश्विनला हा पुरस्कार मिळाला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला कसोटीतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ट्वेंटी-20 मधील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याला मिळणार आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान याला आयसीसीशी संलग्न असलेल्या सहयोगी देशातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC Awards Virat Kohli Is Cricketer Of The Year Captain Of Test And ODI Teams