अव्वल नंबरी पुसणार ‘चोकर्स’चा शिक्का?

पीटीआय
बुधवार, 31 मे 2017

दुबई - ‘मिनी विश्‍वकरंडक’ अशी गणना होणाऱ्या आयसीसी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी अद्ययावत क्रमवारी जाहीर झाली आहे. संघांमध्ये दक्षिण आफ्रिका अव्वल आहे, तर फलंदाजीत त्यांचा अफलातून ‘स्ट्रोक प्लेयर’ एबी डिव्हिलियर्स याने अव्वल स्थान कायम राखले आहे. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा चार क्रमांक भरारी घेत अव्वल बनला आहे. हे अव्वल नंबर आगामी स्पर्धेत सार्थ ठरवून दक्षिण आफ्रिका चोकर्सचा शिक्का पुसणार का, याची उत्सुकता आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत संघांमध्ये बरीच चुरस आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर आफ्रिकेने एक विजय मिळविला. एक गुण कमी झाला तरी त्यांनी अव्वल स्थान कायम राखले. अखेरच्या सामन्यात ३९ धावांत चार विकेट घेतल्यामुळे रबाडाने गरुडझेप घेतली. पाकिस्तानच्या सकलेन मुश्‍ताक याच्यानंतर तो अव्वल बनणारा सर्वांत कमी वयाचा गोलंदाज ठरला. रबाडाचा २२वा वाढदिवस पाच दिवसांपूर्वीच साजरा झाला. त्याने देशबांधव इम्रान ताहीर यालासुद्धा मागे टाकले. पहिले दोन गोलंदाज आफ्रिकेचे आहेत, फलंदाजीत पहिल्या दहा जणांत त्यांचे चार जण आहेत. त्यामुळे क्रमवारीतील स्थान या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सार्थ ठरविण्याचे आव्हान आफ्रिकेसमोर आहे.

Web Title: ICC Champions Trophy Cricket sports