टी-20 क्रिकेटमध्ये सुपरओव्हरसाठी नवे नियम; काय झाले बदल?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

टी20 क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत सुटला तर होणाऱ्या सुपर ओव्हरसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज नवे नियम जाहीर केले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या टी20 मालिकेपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.

दुबई : टी20 क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत सुटला तर होणाऱ्या सुपर ओव्हरसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज नवे नियम जाहीर केले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या टी20 मालिकेपासून हे नवे नियम लागू होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असे आहेत नवे नियम
1. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळविली जाईल. जर सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली तर सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळविण्यात येतील. 

2. सुपर ओव्हरमध्ये प्रत्येक संघाला एक षटक खेळावे लागेल. सर्वाधिक धावा करणाऱ्या संघ सामना जिंकेल. 

3. सुपर ओव्हरमधील षटकात ज्या संघाचे दोन फलंदाज बाद होतील त्याचा डाव संपल्याचे घोषित करण्यात येईल. 

4. सुपर ओव्हरमध्ये प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू (डीआरएस) घेता येईल. सामन्यामध्ये किती रिव्ह्यू घेतले याचा सुपर ओव्हरशी काहीही संबंध नाही. 

5. हवामानाच्या व्यत्ययामुळे जर सुपर ओव्हर लांबली तर सामनाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळी ती घेण्यात येईल. इतरवेळी सामन्यानतंर पाच मिनिटांमध्ये सुपर ओव्हर होईल. 

6. सुपर ओव्हर सुरु असताना कोणताही अडथळा आल्यास ती पूर्ण करण्यासाठी जादा वेळ दिलेली आहे त्यात ती पूर्ण केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC changes Super Over rule