म्हणून विराट होतोय ट्रोल

वृत्तसंस्था
Sunday, 5 August 2018

इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला धावबाद केल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने जोरदार आनंद व्यक्त केला होता. ज्यो रुटला बाद केल्यावर विराट कोहलीने माईक ड्रॉप सेलिब्रेशनवर टिप्पणी केली होती. यावरुन आता विराट कोहलीला ट्रोल केलं जात आहे आणि या प्रकरणात आयसीसीनेही विराटला ट्रोल केले आहे.

एड्जबस्टन - इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला धावबाद केल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने जोरदार आनंद व्यक्त केला होता. ज्यो रुटला बाद केल्यावर विराट कोहलीने माईक ड्रॉप सेलिब्रेशनवर टिप्पणी केली होती. यावरुन आता विराट कोहलीला ट्रोल केलं जात आहे आणि या प्रकरणात आयसीसीनेही विराटला ट्रोल केले आहे.

एजबस्टनमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पराभव झाला होता, त्यावरुनच आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये विराट कोहली हाथ बांधून तर ज्यो रुट हात समोर करुन उभा राहिलेला दिसत आहे. समोर माईकही पडताना दाखवलेला आहे. त्याचबरोबर, या फोटोला कॅप्शन देताना 'रुट आऊट' अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, भारतासोबत एकदिवसीय सामन्यात शतक साजरे केल्यावर ज्यो रुटने त्याची बॅट खाली सोडून माईक ड्रॉप सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर विराटने ज्यो रुटला धावबाद केले त्यावेळी त्याने माइक ड्रॉप सेलिब्रेशनवर प्रतिक्रिया नोंदवली होती. यावर बऱ्याच खेळाडूंनी प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. त्यानंतर आता आयसीसीनेही या विषयावर मजाक उडवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC trolls Virat Kohli with mic drop tweet after India lose Edgbaston Test