पृथ्वीला पाहून समालोचक म्हणाले, 'दॅट इज तेंडुलकर'

वृत्तसंस्था
रविवार, 14 जानेवारी 2018

पृथ्वीची खेळण्याची शैली पाहून वेस्ट इंडीज प्रसिद्ध समालोचक यांनी त्याला थेट दॅट इज तेंडुलकर असे म्हटले. फ्रंट फूटवर त्याने मारलेला फटका पाहून त्यांच्या तोंडून पृथ्वीबद्दल कौतुकाचे शब्द गेले. 

वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याची खेळण्याची शैली पाहून समालोचकांनी थेट त्याचे 'दॅट इज तेंडुलकर' असे नामकरण केले. पृथ्वी शॉ याने या सामन्यात 94 धावांची खेळी केली.

19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत मुंबईकर असलेला पृथ्वी शॉ भारताचा कर्णधार आहे. राहुल द्रविड या संघाचा मार्गदर्शक असून, आज भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 100 धावांनी विजय मिळविला. सलामीला खेळणाऱ्या पृथ्वी शॉ याने मनज्योत कालरा (86 धावा) याच्या साथीने 180 धावांची सलामीला भागीदारी केली. या दोघांच्या खेळीमुळे भारत 328 धावा करू शकला.

पृथ्वीची खेळण्याची शैली पाहून वेस्ट इंडीज प्रसिद्ध समालोचक यांनी त्याला थेट दॅट इज तेंडुलकर असे म्हटले. फ्रंट फूटवर त्याने मारलेला फटका पाहून त्यांच्या तोंडून पृथ्वीबद्दल कौतुकाचे शब्द गेले. 

Web Title: ICC U-19 World Cup India vs Australia Prithvi Shaw Knock Reminds Fans Of Sachin Tendulkar