esakal | वीरू, आफ्रिदी बर्फाच्या मैदानावर भिडणार
sakal

बोलून बातमी शोधा

cricket

भारत आणि पाकिस्तानसह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका संघातील माजी खेळाडू स्पर्धेत खेळताना दिसतील. डायमंड्स आणि रॉयल्स अशी दोन संघांची नावे असणार आहेत. यापूर्वीही सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न या माजी क्रिकेटपटूंनी अमेरिकेत स्पर्धा घेतली होती.

वीरू, आफ्रिदी बर्फाच्या मैदानावर भिडणार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील वाद आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी पाहिला असेल पण आता बर्फाच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटपटू एकमेकांना भिडताना दिसतील. या दोन्ही संघांमध्ये जगभरातील माजी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ येथे 8 आणि 9 फेब्रुवारीला हे सामने होणार असून, एका संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी असणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता हे सामने सुरु होतील. पूर्णपणे बर्फाच्या स्टेडियमवर हे सामने खेळविले जातील. सोनी ईएसपीएनवरून सामन्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तानसह श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका संघातील माजी खेळाडू स्पर्धेत खेळताना दिसतील. डायमंड्स आणि रॉयल्स अशी दोन संघांची नावे असणार आहेत. यापूर्वीही सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न या माजी क्रिकेटपटूंनी अमेरिकेत स्पर्धा घेतली होती. 

डायमंड्स संघ : वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), तिलकरत्ने दिल्शान, माहेला जयवर्धने, माईक हसी, मोहम्मद कैफ, अॅण्ड्र्यू सायमंड्स, जोगिंदर शर्मा, अजित आगरकर, रमेश पोवार, झहीर खान, लसिथ मलिंगा.

रॉयल्स संघ : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), ग्रॅमी स्मिथ, जॅक्स कॅलिस, ओवेस शहा, ग्रँट एलियट, अब्दुल रझ्झाक, मॅट प्रायर, डॅनिएल व्हिट्टोरी, नॅथन मॅकलम, शोएब अख्तर, माँटी पानेसर.

loading image