पाया भक्कम झाल्यानंतरच साकारली कल्पना : सचिन तेंडुलकर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 October 2018

पुणे : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर प्रत्यक्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता. मात्र, आता त्याने कुमार खेळाडूंना दिशा देण्याच्या एका वेगळ्या उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले आहे. "एसआरटी' स्पोर्टस मॅनेजमेंट आणि मिडलसेक्‍स यांची जोडी जमली असून, त्यांनी "तेंडुलकर-मिडलसेक्‍स ग्लोबल' या क्रीडा क्षेत्राला वाहिलेल्या वेगळ्या उप्रकमाला सुरवात केली आहे. 

"टीएमजी' च्या मार्गदर्शनात स्क्वॉश, बॅडमिंटन, टेनिस अशा खेळाचा समावेश असेल आणि यात 19 वर्षांखालील मुले आणि मुलींना क्रिकेट प्रशिक्षणाचा राहणार आहे. 

या संदर्भात बोलताना सचिन म्हणाला,""निवृत्तीनंतर क्रिकेटपासून दूर असल्याचे फक्त दिसत होते. पण, डोक्‍यात विचार सुरू होते. खेळपट्टीवर मोठी भागीदारी रचताना त्याचा पाया भक्कम असणे महत्त्वाचे असते. जोडीदारही तगडा हवा असतो. त्यामुळे मनातील क्रिकेट ऍकॅडमीची कल्पना प्रत्यक्षात उतरविताना चांगल्या सहकाऱ्याची वाट बघत होतो. "सेट' व्हायला पुरेसा वेळ घेतला आणि मिडलसेक्‍सने हात पुढे केल्यावर ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली.'' 

योजनेविषयी आणि मिडलसेक्‍सच्या सहभागाविषयी बोलताना सचिन म्हणाला,""मिडलसेक्‍सला कौंटीचा 156 वर्षांचा आणि माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 24 वर्षांचा अनुभव यात महत्वाचा ठरतो. कल्पना साकारण्यासाठी अशा तगड्या अनुभवाची जोड मिळाल्यावर ती प्रत्यक्षात उतरताना अडचणी येत नाहीत. आमचे विचार जुळले आणि साधारण एक वर्ष तयारी केल्यानंतर आम्ही पुढे पाऊल टाकले.'' 
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या कॅम्प पैकी एक मुंबईला एक नवी मुंबईला आणि एक पुण्यात भरावला जाणार आहे. 
 
अशी आहे "टीएमजी' योजना 
-19 वर्षांखालील क्रिकेटपटूंना मार्गदर्शन 
-लंडन आणि मुंबई राहणार मुख्य केंद्र 
-पहिले शिबिर लंडनला ऑगस्टमध्ये संपन्न, त्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये मुंबई, पुण्यात 
-7 ते 12 आणि 13 ते 18 वर्षांपर्यंत मुले, मुलींचा सहभाग 
-यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील दहा टक्के दुर्लक्षित मुलांच्या विकासाठी खर्च करणार 

भारतात कुठे 
-मुंबई : डी.वाय. पाटील स्टेडियम (1 ते 4 नोव्हेंबर), एमआयजी क्‍लब (6 ते 9 नोव्हेंबर) 

अशी आहे "टीएमजी' योजना 
-19 वर्षांखालील क्रिकेटपटूंना मार्गदर्शन 
-लंडन आणि मुंबई राहणार मुख्य केंद्र 
-पहिले शिबिर लंडनला ऑगस्टमध्ये संपन्न, त्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये मुंबई, पुण्यात 
-7 ते 12 आणि 13 ते 18 वर्षांपर्यंत मुले, मुलींचा सहभाग 
-यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील दहा टक्के दुर्लक्षित मुलांच्या विकासासाठी खर्च करणार 
 
नोंदणीसाठी 
https://www.camptendulkarmga.in 
-पुणे : बिशप्स स्कूल (12 ते 15 आणि 17 ते 20 नोव्हेंबर) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Improved imagery after the founding of the foundation: Sachin Tendulkar