कुंबळे, शास्त्री येतील आणि जातील, पण...: रवी शास्त्री

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

भारतीय संघाने गेल्या तीन वर्षांमध्ये खूप काही केले आहे. भारतीय संघ अव्वल स्थानावर राहिला. याचे सर्व श्रेय संघासोबत असलेल्यांना जाते. भरत अरुण यांचा प्रशिक्षक म्हणून अनुभव चांगला आहे. माझ्यापेक्षा ते या संघाला चांगले ओळखतात.

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे, रवी शास्त्री यांसारखे प्रशिक्षक येतील आणि जातीलही. पण, संघाने मिळविलेले यश हे यांच्या मेहनतीचे आहे, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाला असून, त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी निवडीबद्दल वक्तव्य केले. प्रशिक्षक निवडीचा आणि इतर वादाचा आपल्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे मैदानावरील परिस्थिती सांभाळणार आहे. मैदानाबाहेरील गोष्टी माझ्या नियंत्रणात नसल्याचे मत कर्णधार कोहलीने व्यक्त केले आहे. प्रशिक्षक निवडीच्या वेळी माझ्या भूमिकेबद्दल मीडियामध्ये अनेक चर्चा झाल्या. पण माझ्या हातात फक्त बॅट आहे. या बॅटने सर्वोत्तम कामगिरी द्यायची एवढचं माझ्या हातात आहे, असे कोहलीने सांगितले.

शास्त्री म्हणाले, की भारतीय संघाने गेल्या तीन वर्षांमध्ये खूप काही केले आहे. भारतीय संघ अव्वल स्थानावर राहिला. याचे सर्व श्रेय संघासोबत असलेल्यांना जाते. भरत अरुण यांचा प्रशिक्षक म्हणून अनुभव चांगला आहे. माझ्यापेक्षा ते या संघाला चांगले ओळखतात.

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एकमेव टी-20 सामना होणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IND v SL: Shastris, Kumbles will come & go, I have matured - Ravi Shastri