INDvsAUS : पहिल्या टी-20 साठी भारतीय संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला टी-20 सामना बुधवारी (ता. 21) होत असून, बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा विराट कोहलीकडे असणार आहे. तर यष्टीरक्षकाची जबाबदारी रिषभ पंतकडे देण्यात आली आहे.

नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला टी-20 सामना बुधवारी (ता. 21) होत असून, बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा विराट कोहलीकडे असणार आहे. तर यष्टीरक्षकाची जबाबदारी रिषभ पंतकडे देण्यात आली आहे.
 

तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटूंसह भारतीय संघ या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. अनुभवी दिनेश कार्तिकला फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. मधल्या फळीतील फलंदाज मनिष पांडेला अंतिम 12 मध्ये संधी देण्यात आलेली नाही.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि युझवेंद्र चहल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ind Vs Aus Bcci Announced 12 Players For The 1st T20i Against Australia